शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा l
विषे कंठी काळा त्रीनेत्री ज्वाळा llलावण्य सुंदर मस्तकीं बाळा l
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ll १ ll
जय देव जय देव जय श्रीशंकरा l
आरती ओवाळु तुज कर्पुरगौरा ll धॄ.ll
कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा l
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ll
विभुतीचें उधळण शिवकंठ नीळा l
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ll जय देव.ll २ ll
दैवीं दैत्यीं सागर-मंथन पै केलें l
त्यामाजी अवचीत हालाहल उठीलें ll
तें त्यां असुरपणें प्राशन केलें l
नीळकंठ नाम प्रसिध्द झाले ll जय देव.ll ३ l
व्याघ्रांबर - फणिवरधर सुंदर मदनारी l
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ll
शतकोटीचें बीज वाचें उच्चारी l
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं llजय देव.ll ४ ll
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा